नवीदिल्ली (विशेष प्रतिनिधी) सुप्रसिध्द लेखक, विचारवंत तसेच माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदाची सूत्रे नुकतीच राजधानीत स्वीकारली. आयोगाचे अध्यक्ष व माजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी मुळे यांना शपथ दिली. आयोगाचे सदस्य झाल्यामुळे ज्ञानेश्वर मुळेंना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
मुळे यांनी यापूर्वी सुमारे ३५ वर्षे भारताच्या विदेश मंत्रालयात सेवा बजावली असून मालदीव, अमेरीका, रशिया, जपान आदी राष्ट्रात राजदूत व वाणिज्यदूत म्हणून काम पाहिलेले आहे. यावेळी आयोगातील सदस्य व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.