दिक्षीतवाडीतील उघड्या घरातून महागडा मोबाईल लंपास

chori

जळगाव प्रतिधिनी । उघड्या घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दिक्षितवाडी येथे घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिचा संदिप जाधव (वय-30) रा. दिक्षीत वाडी, एमएसईबी कार्यालयाजवळ हे हातमजूरी करतात. रविवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दरवाजाच्या खिडकीजवळ कुलरवर मोबाईल चार्ज करण्यासाठी लावून आपल्या स्वयंपाकासाठी घरात निघून गेल्या. तर पती संदीप जाधव हे खासगी नोकरीला कामाला आहे ते देखील डबा घेवून घरातून निघून गेले. पुढच्या घरात कोणीही नसतांना अज्ञात व्यक्तीने चार्ज करण्यासाठी लावलेला 23 हजार रूपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी रिचा जाधव यांनी मोबाईल चोरी गेल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content