रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथील दिवानशा बाबांचा उरूस व कव्वाली कार्यक्रम कोरोनाच्या आपत्तीमुळे रद्द करण्यात आला आहे.
रसलपुर येथील दिवानशा बाबा उरूस निमित्त दरवर्षी कव्वाली व यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते,परंतु कोरोना या संसर्ग महामारी मुळे रसलपुर ग्राम पंचायत येथे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सुरेश धनके, अय्युब पहेलवान,गावातील यात्रेचे आयोजक व गावकर्यांची मीटिंग घेतली. या मध्ये कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे दिवानशाबाबा उरूस यात्रा तसेच कव्वालीचा कार्यक्रम दि २० डिसेंबर व २१ डिसेंबर रोजी होणार नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
तसेंच रावेर येथील दत्त जयंती निमित्त रथ मिरवणुकीला परवानगी नसून जागेवरच रथाचे पूजन करावे,फटाका शो तसेच यात्रेला परवानगी नाही तसेच गावोगावी होणारे यात्रेला कोरोना या संसर्गजन्य महामारी मुळे शासनाचे आदेशानव्ये परवानगी मिळणार नाही.त्यामुळे कोरोना या संसर्गा पासून संरक्षण होणेकरिता शासनास, पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.