‘हक्काचं धान्य मिळावं’ या मागणीसाठी दिव्यांग सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी | जागतिक अपंग दिन दिनाच्या अनुषंगाने अपंगावर स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेला अन्याय दूर करत आपणास हक्काचं धान्य मिळावं यासाठी जळगावच्या दिव्यांग सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.

आज संपूर्ण देशामध्ये जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने आपल्या दिव्यांग सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानकडून धान्य वाटप होत असतं. दिव्यांग मानवासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाकडून दिनांक 1 जानेवारी 2019 पासून अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशानुसार, ‘घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचं शिधापत्रिकेत नाव असल्यास संपूर्ण कुटूंबाला 35 किलो धान्य वाटप करण्यात यावे’ असे असतांना जळगाव शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानातून सदरील अध्यादेशाची पायमल्ली होत असून दिव्यांगांना हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवले जात आहे.

याबाबत संबंधित दुकानदाराची विचारपूस केली असता आम्हाला याबाबत माहीतच नाही. किंवा तुमचा कोठा आलेला नाही, सध्या तो शिल्लक नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिव्यांग बांधवाचे एक प्रकारे हेटाळणी करून अन्याय करत असल्याची भावना दिव्यांगांनी निवेदनात मांडली आहे.

आज जागतिक अपंग दिनानिमित्त आम्हाला हक्काचं शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक दिव्यांग बांधवास 35 किलो धान्य मिळणेबाबत योग्य सूचना जिल्हा, तालुका पुरवठा शाखेचे अधिकारीवर्ग आणि सर्व शहरातील जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात यावेत तसेच हक्काचे 35 किलो धान्य देण्यात यावी जेणेकरून दिव्यांगांवर होत असलेला अन्याय दूर होईल अशी भावना निवेदनातून भरत जाधव, महाराष्ट्र राज्य सचिव अक्षय महाजन, जिल्हाध्यक्ष जळगाव, शेख शकील जिल्हा उपाध्यक्ष, नितेश तायडे जळगाव जिल्हा सचिव, नितीन सूर्यवंशी, भीमराव मस्के, मूकबधिर जिल्हाध्यक्ष तोशीफ शहा यासह शहर सचिव यांनी दिले आहे. महिनाभरात आम्हाला हक्काचे 35 किलो धान्य शहरातील व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून मिळाले नाही तर नाईलाजाने सर्व दिव्यांग बांधव 1 जानेवारी रोजीपासून उपोषणाचा मार्ग अवलंबतील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

Protected Content