जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने यंदाची नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धा जळगांवात होणार आहे. जळगाव टेबल टेनिस असोसिएशनतर्फे २३ व २४ सप्टेंबर रोजी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जळगांव जिल्हा क्रीडा संघाच्या हॉल मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
उत्तर महाराष्ट्र विभागीय या स्पर्धेत यजमान जळगाव सह नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील.स्पर्धा आयोजना संदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, अरविंद देशपांडे, सहसचिव सुनील महाजन, कोषाध्यक्ष संजय शहा, राजु खेडकर,ऍड. विक्रम केसकर, शैलेश जाधव, स्वानंद साने, अमित चौधरी, विजय विसपुते आदी उपस्थित होते.
विभागीय स्पर्धेत ११,१३,१५,१७ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच पुरुष व महिला गटाचे सामने खेळविण्यात येणार आहे.प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सचिव विवेक आळवणी (मो.९४२२७७४०५५) किंवा स्वानंद साने (मो.९८२३८ ७९९४३) यांचेशी जळगाव मेडिकल,जैन मंदिरा शेजारी,काँग्रेस भावन समोर येथे संपर्क साधावा.तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.