नाशिक प्रतिनिधी । विभागीय लोकशाही दिनात आज प्राप्त झालेल्या तक्रार अर्ज संबंधित विभागाने त्वरित निकाली काढावेत, अशा सूचना अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनाच्या बैठकीत अप्पर आयुक्त श्री. पालवे बोलत होते. यावेळी सर्वश्री उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, डॉ. प्रविण देवरे, डॉ. अर्जुन चिखले, दत्तात्रय बोरुडे, डॉ. स्वाती देशमुख-पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती सुरेखा पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दिपक बिरारी, नाशिक जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज आयोजित करण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात 5 नवीन तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. या तक्रार अर्जांवरील कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.