जळगाव प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत देशभरातील दिव्यांगांनी जबाबदार नागरिकत्वाचे कर्तव्य मतदानाच्या माध्यमातून पार करावे, यासाठी उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांची कार्यशाळा खोटे नगर येथील विद्यार्थ्यांनी आज दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मतिमंद विद्यालयातील व कार्यशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग होता. मतदानाबाबत जागृती फलक तयार करून परिसरातील मतदारांना जागृत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय बोरसे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.