यावल, प्रतिनिधी | गोरगरीब नागरीकांना शिधापत्रीकाव्दारे शासनाकडुन पाठविण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याची अवैधरित्या साठवन करून काळया बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेल्या गोदामावर जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या पथकाने रावेर परिसरात विविध ठीकाणी छापे टाकले. यात सुमारे ३० लाख रुपयांचा गहु, तांदुळ, साखर, मका जप्त करण्यात येवुन रावेरचे पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या फिर्यादी वरून यावल येथील सुनिल बाळकृष्ण नेवे व विलास चौधरी यांच्याविरुद्ध रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अधिक चौकशीकामी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या र्निदेशाने यावल तालुक्यातील सुनिल नेवे हे चालवित असलेल्या २४ स्वस्त धान्य दुकानांची आज सकाळपासुन नायब तहसीलदार आर.के. पवार साकळीचे मंडळ अधिकारी व्ही.ए. कडनोर, नायब तहसीलदार रविन्द्र माळी यांच्या सोबत भालोद मंडळ अधिकारी आर.डी. पाटील,सचिन जगताप सहअट्रावल चे तलाठी निलेश धांडे, राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी प्रत्येक्ष गावागावात जावुन धान्य मिळवणाऱ्या विविध जातीधर्माच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेटी घेवुन धान्य मिळण्याबाबत माहिती जावुन घेत त्यांच्या कडुन तशी माहीती मिळवुन या चौकशीतुन मिळवलेली माहीती अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दिली. रेशन धान्य साठवन घोटयाचे प्रकरण उघडकीस आल्याने काळ्या बाजारात रेशनींग चा धान्य विकणाऱ्या धान्यमाफीया यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.