Home Cities जळगाव जळगावमध्ये कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेची जिल्हा बैठक

जळगावमध्ये कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेची जिल्हा बैठक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विविध सामाजिक आणि उपक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

संस्थेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाचे तिसरे वर्ष यंदा पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर विनामूल्य सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्षांची निवड एकमुखाने करण्यात आली. संस्थेचे प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले की, भविष्यात संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

बैठकीत जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी संस्थेच्या आगामी कार्यक्रमांची योजना ठरविण्यात आली आणि समाजातील विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी चत्रभुज सोनवणे, जगन्नाथ बाविस्कर, गोकूळ सूर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोळी समाज बहुउद्देशीय संस्था जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे या बैठकीत दिसून आले आहे.


Protected Content

Play sound