जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नागरीकांच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे 1 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 1 जुलै, 2019 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनाच्या दिवशी लेखी स्वरुपात घेऊन याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.