Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन


जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. माहे ऑगस्ट 2019 महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. 5 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित केलेला आहे.

 

माहे ऑगस्ट 2019 या महिन्यात पहिला सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी असल्याने त्या दिवशी नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 3.00 वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound