अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय प्रहार न्यायमंच आश्रम शाळा संघटनेची जळगाव जिल्ह्याची कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
या कार्यकारीणीत जिल्हाध्यक्षपदी मांडवेदिगर ता.भुसावळ येथील आश्रम शाळेचे उपशिक्षक आबा पाटील यांची निवड करण्यात आली असून वसंतनगर ता.पारोळा येथील माध्यमिक आश्रम शाळेचे उपशिक्षक प्रमोद निकुंभे यांची जिल्हा सहसचिव तर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्रा.नितिन चव्हाण यांची जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची निवड राज्यमंत्री बच्चू कडू, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे, राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यांच्या निवडीबद्दल वसंतनगर येथील वसंतराव ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव, मुख्याध्यापक सी.के.पोतदार यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे