सावदा/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा काँग्रेस भवनात एनएसयुआय संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, चेतन बाविस्कर आणि जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव यांच्या उपस्थितीत एनएसयुआयची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणी याप्रमाणे –
सरचिटणीसपदी निलेश राजू बाक्षे (कळमोदा ता रावेर), घनश्याम पद्माकर पाटील (चोपडा), उपाध्यक्ष अतुल किसन राठोड (पोखरीतांडा ता धरणगाव), ऋषिकेश विजय पाटील (मुक्ताईनगर), समीर युसूफ खान (जळगाव) यांची निवड करण्यात आली.
नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्याच्या वतीने महविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनवर होणारा अन्याया विरुद्ध एनएसयुआय ही संघटना वेळोवेळी विद्यार्थ्यांन सोबत उभी असते. जिल्हा कार्यकारणी झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. जेणेकरून आपल्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या मुला – मुलींना ज्या समस्या असतात. एसटी बसेचचा, शाळा कॉलेजमधील रॅगिंग, जास्तीची फी आकारणे अश्या अनेक प्रकारचा होणारा त्रास होऊ नये. यासाठी ही संघटना विद्यार्थ्यांन सोबत भक्कम पणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे अशी प्रतिक्रीया नवनियुक्त सदस्यांनी केली आहे.