जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील धरणे व जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी याकरिता धरणांतील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. या अभियानाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते अमळनेर तालुक्यातील आर्डी येथे करण्यात आला.
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलावातील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वखर्चाने वाहून न्यायचा आहे. गाळ उपासण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री हि “अनुलोम” सामाजिक संस्था देणार असून इंधनावरील खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे.
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय’ या अभियानाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते अमळनेर तालुक्यातील आर्डी येथे करण्यात आला. यावेळीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अमळनेरच्या तहसीलदार सौ. ज्योती देवरे, जि. प. सदस्य संदीप पाटिल अनुलोम चे उपविभाग जनसेवक दत्ता नाईक, अमळनेर भाग जनसेवक संजय कोळी यांच्यासह अनुलोम वस्ती मित्र व स्थान मित्र ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण, शेतकरी, जेसीबी व ट्रॅक्टर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.