शेतकऱ्यांना पीक विमा हप्त्यासाठी जिल्हा बॅक देणार कर्ज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना विमा हप्त्याची रक्कम कर्ज म्हणून देण्याचा निर्णय जिल्हा बँकने घेतला आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिली.

 

जिल्हा बँकेच्या सभागृहात शुक्रवारी १५ जुलै रोजी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, संचालक संजय पवार, प्रतापराव पाटील, महितापसिंग नाईक, कार्यकारी संचालक तथा व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती.

 

जिल्हा बॅकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करण्यात आली होते. ती सक्ती आता बँकेने ऐच्छीक केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना विमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी बँक शाखेतून संमतीपत्र भरून दिल्यास शेतकऱ्यांना विमा हप्ता बँकेकडून विमा कंपनीकडे भरला जाणार आहे.

 

जिल्हा बॅकेच्या ताब्यात असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीचा निर्णय जिल्हा बॅकेने यापुर्वीच घेतला आहे. १५ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कारखान्याच्या मुल्यांकनास मंजुरी देण्यात आली. २७ हेक्टर जमीन आणि कारखाना या दाेघांची किंमत ६२ काेटी रूपये काढण्यात अाली अाहे. कारखान्याची उर्वरित ३० हेक्टर जमीन बॅकेकडे कायम राहणार अाहे. तसेच यावल येथील जे.टी. महाजन सुतगिरणी अाणि खडका सुतगिरणीची विक्रीसाठी फेरनिविदा काढण्याचा ठराव यावेळी करण्यात अाला.

Protected Content