जळगाव, प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित जिल्हा परिषदतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार आज खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली वितरीत करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. उज्वला पाटील, जि. प. शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, बांधकाम, महिला व बालविकास सभापती रजनी चव्हाण, आरोग्य समिती सभापती दिलीप पाटील, जि. प. सदस्या पल्लवी सावकारे, मीना पाटील, माधुरी अत्तरदे, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, शिक्षण समिती सदस्य हरीश पाटील आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी अपडेट राहावे – खासदार खडसे
जळगाव जिल्ह्याने सेमी पद्धती प्रथम अवलंबली यानंतर महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढून राज्यभरात लागू करण्यात आले असल्याचे गौरद्गार खासदार रक्षा खडसे यांनी अध्यक्षस्थानावरून काढले. त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकामध्ये क्षमता असल्याने ते मुलांना पुढे नेऊ शकतात. शिक्षक स्वतः ला अपडेट करत राहिले तर ते मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतात.
देश पातळीवर जि. प. शिक्षण आदर्श ठरावे – खासदार पाटील
जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढत आहे. शिक्षकांनी जर ठरविले तर ते जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रास बळकटी देऊ शकतात. देशात जळगाव जिल्हा परिषदेने शिक्षणाचा चांगले उदाहरण तयार करा ज्यामुळे केलेल्या कार्याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. ते शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढत आहे. शिक्षकांनी जर ठरविले तर ते जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रास बळकटी देऊ शकतात. देशात जळगाव जिल्हा परिषदेने शिक्षणाचा चांगले उदाहरण तयार करा ज्यामुळे केलेल्या कार्याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.
यांना मिळाला पुरस्कार : अशोक रघुनाथ पाटील उपशिक्षक शिरूड तालुका अमळनेर ,संगीता शिवाजी पाटील उपशिक्षिका गोंडगाव तालुका भडगाव , लीना सुरेश अहिरे पदवीधर शिक्षक कन्हाळा तालुका भुसावळ ,दिलीप शांताराम जवरे उपशिक्षक पळासखेडे बुद्रुक तालुका बोदवड ,रमेश पांडुरंग जगताप वैजापूर तालुका चोपडा, प्रदीप शांताराम पाटील उपशिक्षक सिंधी तालुका चाळीसगाव, सुलोचना पांडुरंग बाविस्कर मुख्याध्यापिका केंद्र शाळा पाळधी तालुका धरणगाव, गोविंदा इच्छाराम वंजारी उपशिक्षक दापोरी तालुका एरंडोल ,किशोर मंगा सोनवणे शिक्षक पिलखेड तालुका जळगाव, समाधान पांडुरंग ठाकरे उपशिक्षक भिलखेड तालुका जामनेर,सुरेश रूपचंद सोनवणे उपशिक्षक मेंढाळदे तालुका मुक्ताईनगर, आशा विलास राजपूत उपशिक्षिका कन्या शाळा नंबर १ ता. पाचोरा, मनिषा भानुदास शिंदे उपशिक्षक बाहदरपुर तालुका पारोळा, रेखा रत्नाकर वैद्य मुख्याध्यापिका मुंजलवाडी तालुका रावेर, कुंदन बळीराम वायकोळे उपशिक्षक वनोली तालुका यावल.
प्रोत्साहनपर पारितोषिक : काझी मोहम्मद अनिस वसियुद्दीन उपशिक्षक उर्दु कन्या शाळा नशिराबाद तालुका जळगाव, नरेंद्र विठ्ठल पाटील मुख्याध्यापक, बलवाडी ता. रावेर, कैलास मधुकर माळी उपशिक्षक बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा धरणगाव, अजीत निळकंठ चौधरी उपशिक्षक टोके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव
…अखेर पालकमंत्री विना पारपडला सोहळा
दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीतच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन हे उपलब्ध नसल्याने तो पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आज देखील पालकमंत्री न आल्याने उपस्थितांनमध्ये चर्चा रंगली होती.
दरम्यान, विधानसभा २०१९ साठी नोडल अधिकारी बी. जे. पाटील यांचे स्वीय सहाय्यक डॉ. मिलिंद बागुल यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यक्रमात प्रतिज्ञा देण्यात आली.