रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे गरिबांना स्वेटर वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनची संस्थापक अध्यक्षा चित्रा मालपाणी यांची लहान कन्या कु. रिध्दी मालपाणी हिच्या वाढदिवसानिमित्त स्वेटर गरजूंना व गरिबांना वाटप करण्यात आले. 

(दि.२७) डिसेंबर रोजी रिध्दी जानवी फाऊंडेशन जळगाव यांच्यातर्फे रिध्दी सिध्दी जान्हवी फाऊंडेशनची संस्थापक अध्यक्षा चित्रा मालपाणी यांची लहान कन्या कु. रिध्दी मालपाणी हिच्या वाढदिवसानिमित्त स्वेटर भुसावळ येथील कंडारी गावात अति दुर्गम भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व महिलांना कु. रिध्दी हिच्या वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटप करण्यात आले. रिध्दी मालपाणी, उपाध्यक्ष पद्रमावती राणा, किर्तीमाला राणा, निशा पाटील, भुषण पाटील, चंदन पाटील, नुर सर, जीवन बारके, तेथील ग्रामपंचायत सदस्य व समाज सेवक श्याम मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

 

 

Protected Content