अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने शहरातील कचरा विल्हेवाट डेपोतील महिला व पुरुष कामगारांना सनकोट व रुमालाचे वाटप करण्यात आले.
सोबतच येथील पूर्ण प्रकल्पाची संपूर्ण माहिती मंचच्या महिलांनी करुन घेतली. या प्रकल्पात संपूर्ण अमळनेर शहरातील ओला आणि सुका कचरा आणला जातो. येथील कामकरी महिला दिवसभर ऊन्हात राबून या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम करतात. त्यांच्या कामाचा मान राखून त्यांना सनकोट आणि रुमाल वाटप करण्याची संकल्पना अमळनेर महिला मंच ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अपर्णाताई मुठे व इतर ट्रस्टींच्या मनात आली आणि काही दानशूर महिला सदस्यांनी या उपक्रमास भरभरून साथ दिल्यामुळे हे सर्व शक्य झाले. तसेच यावेळी येथील सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार पण मंचच्या वतीने देण्यात आला.
सदर प्रसंगी महिला मंच ट्रस्टच्या उपाध्यक्ष सौ तिलोत्तमाताई पाटील, खजिनदार कांचनभाभी तसेच ट्रस्टी मेंबर करुणा सोनार, विद्या हजारे, माधुरी पाटील, पद्मजा पाटील, विजया देसर्डा या हजर होत्या. तसेच मंचच्या सभासद भावना जीवनानी,अलका गोसावी, पूजा शहा,वासंती पाटील, शर्मिला बडगुजर, मेघा कुलकर्णी, चंदा वैद्य, सुरेखा पाटील सुध्दा हजर होत्या. मंच उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील यांनी मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले तसेच मंच अध्यक्ष डॉ.अपर्णा मॅडम यांनी आभार मानले.