जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील तांबापुर भागातील महिलांना स्त्री सबलीकरण या योजनेखाली सक्षम पर्यायी रोजगार मिळावा म्हणून शिलाई मशीनचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे.
अभेद्य फाउंडेशनच्या वैशाली झाल्टे तांबापुरा परिसरात काम करीत असल्याचे जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना कळल्यानंतर त्यांनी दोन्ही समाजातील स्त्रीयांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा मानियार बिरादरीतर्फे चार शिलाई मशीनचे वाटप करण्याचा निश्चय केला. त्यानुसार नफीसा खान,नौशाद शाह, रिजवाना जावेद, मनीषा भोई, शिरीन शाह, यांना मशीन सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख ,संचालक अब्दुल रहीम सय्यद सलीम व अभेद्य फाउंडेशनच्या वैशाली झालटे उपस्थित होत्या.
स्त्री सबलीकरण अंतर्गत महिलांना सक्षम पर्यायी रोजगार मिळावा म्हणून अशोकभाऊ जैन हे आपल्या औद्योगिक क्षेत्रात महिलांना काम देत असतात. परंतु काही महिला आपल्या घरगुती अडचणीमुळे बाहेर निघू शकत नसल्याने त्यांना त्यांच्या घरी रोजगार मिळवून द्यावा, याच उद्देशाने अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महिलांना शिलाई मशीन वाटप करून मानियार बिरादरीने एक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैशाली झालटे यांनी हा उपक्रम वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना सर्व ती मदत बिरादरी देईल,असे आश्वासन देण्यात आले आहे.