पहूर, ता जामनेर, प्रतिनिधी | औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे यंदा गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत आठ शाळांची निवड करण्यात आली असून आज (दि.१) जळगाव जिल्ह्यातील आठ जि.प. प्राथमिक शाळासह कन्या शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी सोशल मिडीयावर ‘माणुसकी व्हाँट्सअँप समुहामधील’ दानशूरांनी शैक्षणिक साहित्य जमा करण्यात मोलाचा वाटा उचलला. यातून आठ शाळांतील तब्बल १०११ विद्यार्थ्यांना रजिस्टर, वह्या, पेन, पेन्सील, खोड रबर तसेच गरजवंतांना दप्तर, चॉकलेट या साहित्यांची कीट भेट देण्यात आले.
एका दिवसात आठ शाळांमध्ये शालेय साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. यातील जिल्हा परीषद प्राथमिक व कन्या शाळा पुढील प्रमाणे आहेत. जि.प.प्रा कन्या शाळा मुलीची शेंदुर्णी, जि.प.प्रा.मुलांची शाळा शेंदूर्णी, जि.प.प्रा.शाळा बाहेरपुरा शेंदुर्णी, जि.प.प्रा.ऊर्दू शाळा ईदगाह शेंदुर्णी, जि.प.प्रा.शाळा फुकटपुरा शेंदूर्णी, जि.प.प्रा.कन्या शाळा कळमसरा, जि.प.प्रा.कन्या शाळा लोहारा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळधी. पाळधी येथील जि प शाळेत शालेय साहित्य वाटप करताना माणुसकी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित, नीता पाटील, प.स सभापती जामनेर, गजानन क्षिरसागर अध्यक्ष माणुसकी रुग्णसेवा ग्रुप जळगाव, राजू भोई निर्माता व अभिनेता, अण्णा सुरवाडे केसांवर फुगे फेम गायक व अभिनेता, नितिन पाटील अभिनेता, ईश्वर पाटील महाराज, विनोद कोळी, दत्ताञय माळी, दिलीप चौधरी, मनोज नेवे, गोपाल वाणी, यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.