भुसावळ प्रतिनिधी । येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था जी. जळगाव यांच्या वतीने गडकरी नगरातील संत गाडगे महाराज वस्तीगृह अनाथालयात अन्नदान व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधत शालेय वस्तु व अन्नदानाचा वाटप करण्यात आले होते. याकार्य क्रमासाठी डी.वाय.एस.पी.गजानन राठोड व सह पोलिस अधिकारी प्रा.सोपन बोरहाटे, चंद्रकांत चौधरी, गिरीश कोली, प्रा.निलेश गुरुचल, के.यम.सालूंके, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे, ऊ.अ वंदना जोगदंड, स.शिला लाहाने, वंदना आराक, विमल गवई, निर्मला लाहाने, पल्लवी रंधे, पुष्पा निकम, रंजना दांडगे, रूपाली आराक यांच्याहस्ते वस्ती गृहातील सर्व मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आला. तर कु.पूर्वा रंधे व अस्था तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले.