जळगाव, प्रतिनिधी । शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांनी निर्मल्य संकलन, श्री गणेशाची मूर्ती संकलन अशी सेवा दिली. यासोबतच सेवन सौल्स फाऊंडशनतर्फे श्री गणेशाच्या विसर्जनासाठी तैनात असलेले महापालिका व पोलीस कर्मचारी यांना सॅनिटाइझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
गणेश विसर्जनानिम्मित सेवन सौल्स फाऊंडशनतर्फे गणेश घाट मेहुरुण तलाव येथे महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना सॅनिटाइझर व मास्कचे ५०० किट वाटप करण्यात आले. तसेच पाणी बॉटलचे देखील वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सस्थेचे गौतम चौधरी, सोहंम विसपुते, तुषार पाटील, पवन भुतडा, तेजस पाटील, सुष्मीत दीक्षित,सनी राणे,भूषण पाटील,कपिल महाजन,रितेश महाजन आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/240424543900661/