जामनेर प्रतिनिधी | शहरातील ‘मोहन भवन प्रतिष्ठान’च्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रम राबवत या माध्यमातून शहरातील सुमारे दोनशे कुटुंबांना ‘राशन किट’चे वाटप करण्यात आले.
यावेळी मोहन भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा वंदना लोढा, आशा कोठारी, जितेंद्र पालवे, दीपक देशमुख, वसीम शेख, सुजित सैतवाल, गोपाळ देशपांडे, प्रदीप सिनकर आदी. प्रतिष्ठानचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारी आजार सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षापासून शहरातील मोहन भवन प्रतिष्ठानतर्फे गरीब गरजूंना ‘राशन किट’ वाटप करण्यात येत असून जामनेर तालुक्यासह जिल्हाभरात मदत पोहोचत आहे. त्याचबरोबर अनेक कुटुंबांना आर्थिक मदतही प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘जीवनावश्यक वस्तू वाटप’ कार्यक्रमात बोलताना ‘आगामी काळातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजूंना मदत पुरवली जाईल.’ अशी ग्वाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा यांनी दिली