जळगाव प्रतिनिधी । महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने रामेश्वर कॉलनीतील सृष्टी ब्यूटी पार्लरच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते विद्यार्थींनींना पार्लर साहित्य व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील सृष्टी ब्यूटी पार्लर याच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात १४ विद्यार्थींनील सहभाग नोंदविला होता. आज महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत विद्यार्थीनींना पार्लर साहित्य आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वयंम सिध्दंम स्वरोजगारमुखी सायलीकॉस्मेटीकचे संचालक संजय पाटील, सृष्टी ब्यूटी पार्लरच्या संचालिका प्रियंका किरंगे, सपना मोरे, मंदा सपकाळे, दुर्गेश्वरील पाटील, भारती वरळे, चौताली कोल्हे, सोनाली वरळे, रिमझिम कोल्हे, मानसी भोवरे, भाग्यश्री चौधरी, आरती आरसुळ, देवयानी सोनवणे, खुशबु निशाद, राणी चव्हाण, राधा लाळगे या 4 मुलींना पार्लर साहीत्य व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.