भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खडका येथील अंगणवाडीत आज महिला क्रीडा मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील खडका येथे अंगणवाडी केंद्रांमध्ये लहान बालक आणि गरोदर मातांसाठी पौष्टिक आहाराचे आज महिला क्रीडा मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आले लहान बालकांमध्ये कुपोषित होण्याचे प्रमाण जास्त आहे लहान बालक कुपोषित होऊ नये यासाठी बालकांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले जेणेकरून लहान बालक हे कुपोषित राहू नये व गरोदर माताना ही आज पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले आईच्या गर्भामध्ये बाळाची चांगली वाढ व्हावी आणि सुदृढ असे बाल जन्माला यावे म्हणून हा उपक्रम महिला क्रीडा मंडळाच्या वतीने राबवण्यात आले असल्याची माहिती महिला क्रीडा मंडळाच्या आरती चौधरी यांनी दिली आहे