चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील सेवानगर येथे बाजरीचे बियाणे उपलब्ध झाल्याने येथील ५० लाभार्थ्यांना कृषी सहायक चारुदत्त पाथरे यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर कृषी विभागामार्फत विविध अभियान राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध ठिकाणी मोफत बाजरीचे बियाणे वितरीत करण्यात येत आहे. तालुक्यातील सेवानगर ग्रामपंचायतीला कृषी विभागामार्फत शनिवार रोजी मोफत धनशक्ती वाणीचे बाजरीचे बियाणे उपलब्ध झाले. त्याअनुषंगाने कृषी सहायक चारुदत्त पाथरे यांच्याहस्ते ५० लाभार्थ्यीला वितरीत करण्यात आले. हे बाजरीचे बियाणे ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड यांनी उपलब्ध करून दिले आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
याप्रसंगी कृषी सहायक चारुदत्त पाथरे, सरपंच विमलबाई राठोड, उपसरपंच समाधान चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड, विक्रम राठोड, अमोल चव्हाण, दिनेश महाजन, शेतकरी मित्र ज्ञानेश्वर पाटील, आबा महाजन व प्रत्यक्ष लाभार्थी उपस्थित होते