यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे क्षेत्रीयसह सुविधा केंद्र पश्चिमी विभाग,राष्ट्रीय औषधी वनस्पती केंद्र आयुष मंत्रालय भारत सरकार व कल्पतरु सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांना औषधी वनस्पतींचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावल तालुक्यातील किनगावसह पंचकृषीत ७५०० औषधी वनस्पतींचे रोपे वाटप करण्यात येणार आहेत असल्याची या वेळी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिगंबर मोकाट (क्षेत्रिय संयोजक पश्चिमी विभाग राष्ट्रीय औषधी वनस्पती केंद्र) हे होते. यावेळी डॉ.शिंदे (संचालक आयुष आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड), डॉ.डी.जी.नाईक ( शास्त्रज्ञ, जैविक शेती) सरपंच सौ.निर्मला पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील,पोलिस पाटील रेखाताई नायदे, डांभूर्णी चे माजी सरपंच पुरूजीत चौधरी व इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी डॉ.दिगंबर मोकाट यांनी आर.सी.एफ.सी केंन्द्राबद्दल माहिती देऊन शेतकरी बांधवांना एकत्रीत येण्यासाठी आवाहन केले व या हरित क्रांतीसाठी अनमोल मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी माती व त्याचे महत्व याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांना आश्र्वस्त केले वं तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून शाश्वत शेतीचा संकल्प करावा या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पतरू सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयूर पाटील व सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते रोपे वाटप करण्यात येवुन कार्यक्रमाची सांगता झाली.