पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा (एडीआयपी) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून व खासदार उन्मेश पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री करण पाटील यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी पारोळा तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने अंजली करण पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण, तालुकाध्यक्ष अनिल पाटील, भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष शालिक पवार, नगरसेवक पीजी पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या चौधरी, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, भाजपा सरचिटणीस विनोद पाटील, भाजपा व्यापारी जिल्हा उपाध्यक्ष मनोजभाऊ जगदाळे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष भागवत चौधरी, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बापू महाजन,नगरसेवक बापू महाजन नगरसेवक संजय पाटील, अनिल टोळकर, अभियंता सेल तालुकाध्यक्ष गणेश पाटील, अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष दिपक वानखेडे, भावी नगरसेवक भिकन सखाराम चौधरी ,समाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, संकेत पाटील, भूषण महाजन, करण पाटील मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.