जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सांस्कृतिक वार्ताहर: श्री गजानन हार्ट अँड आय हॉस्पिटल प्रा. लि. यांच्यातर्फे प्रायोजित करण्यात आलेल्या स्व. गणेश चौधरी व स्व. दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कारांचे वितरण जळगाव येथील आयएमए सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या समारंभात दोन उत्कृष्ट साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला, तसेच एका काव्यसंग्रहाचे प्रकाशनही झाले.
सेवानिवृत्त प्रा. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेवा गणबोलीचे उपासक डॉ. अतुल सरोदे, प्रा. डॉ. आशुतोष पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर आणि बाळकृष्ण सोनवणे उपस्थित होते.
स्व. गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार: हा पुरस्कार ‘भूंड्या डोंगराचे दिवस’ या काव्यसंग्रहासाठी कवी प्रा. रवी कोरडे (फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना प्रदान करण्यात आला. तर स्व. दिवाकरदादा चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार: हा सन्मान ‘बाय ग…सामान्य स्त्रीचे सामान्य जनजीवन’ या कादंबरीसाठी कादंबरीकार व नगरविकास मंत्रालय माजी उपायुक्त विद्या पोळ-जगताप यांना मिळाला. या दोन्ही पुरस्कारार्थींना प्रा. डॉ. आशुतोष पाटील आणि डॉ. अतुल सरोदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
‘खेड्यातले येडे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन: पुरस्कार वितरणासोबतच, कवी डॉ. अतुल सरोदे यांच्या “खेड्यातले येडे” या लेवा गणबोलीतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर डॉ. विवेक चौधरी, पुरुजीत चौधरी, प्रियदर्शिनी सरोदे आणि डॉ. अंजली चौधरी यांची उपस्थिती होती. या समारंभाला प्रभात चौधरी, डॉ. अरविंद नारखेडे, माजी प्राचार्य एस. एस. राणे, माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक साहित्यप्रेमींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विवेक चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन गोपीचंद धनगर यांनी के



