सावदा प्रतिनिधी । आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल यांच्या मार्फत येथील १८३ लाभार्थ्यांना खावटी योजनेत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळेस उपस्थित सावदा नगरपालिकेचे मुख्यधिकरी किशोर चव्हाण साहेब ग्रह अधिकारी सचिन चोळके साहेब व सावदा न.पा.नगराधक्षा अनिता पंकज येवले, उपनगराध्यक्ष विश्वास तुकाराम चौधरी, उपनगराध्यक्ष विद्यामान नगरसेविका शबाना मुराद तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंकज शेठ येवले, नगरसेवक शेरखा चांदखॉ तडवी, आदिवासी एकता मंचचे सदस्य मुराद शेरखा तडवी, रमजान तडवी, राहुल तायडे, ग्रहपाल, कुंदा भंगाळे ग्रहपाल, शशिकांत भालेराव, सुभाष गाढे, सुमित वर्मा, रुपेश मंडवी नवाज रमजान तडवी यांच्या हस्ते खावटी किट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित फिरोज तडवी, सलीम तडवी,पप्पू तडवी,अजित तडवी, नजिर तडवी रशिद तडवी समशेर तडवी,इमरान तडवी बिस्मिल्ला तडवी,हसन तडवी समाज बांधव उपस्थित होते.