यावल प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा आदीवासी बांधवांना खावटी किटचे वितरण करण्यात आले.
दि.१६ ऑगस्ट २०२१ रोजी भूमिपूजन शुभ हस्ते मा सौ लताताई सोनवणे प्रमुख उपस्थिती मा.आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते खालील विकास कामांचा वाघिरा तालुका यावल येथे आश्रम शाळा दुरुस्ती; खावटी अनुदान वाटप; दोन गाव तालुका यावल येथे स्मशानभुमी बांधणे; चिंचोली येथे संरक्षण भिंत बांधणे; शिरागड येथे पेवर ब्लॉक बसवणे; ईचखेडा तालुका यावल येथे पेवर ब्लॉक बसवणे.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे, सेनेचे तालुका उपप्रमुख योगेश पाटील, उपतालुकाप्रमुख विनायक पाटील, तालुका उपप्रमुख पप्पू जोशी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, यावल रोहिदास महाजन किनगाव मनोहर पाटील, सरपंच गिरगाव प्रताप सोनवणे, सरपंच शिरागड मोहन कोळी, सरपंच पिंपरी भरत चौधरी, चुंचाळे भरत राजपूत बोराडे, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे, बोराडे निलेश, साळुंखे चिंचोली सूर्यभान डोणगाव आदिवासी तालुका संघटक बारसिंग बारेला वागझिरा दिनेश साळुंके, चिंचोली सुधाकर वाघोदा, मनोहर पाटील, गिरडगाव अण्णा कोळी, डांभुर्णी अशोक पाटील, थोरगव्हाण समाधान कोळी, थोरगव्हाण पिंटू साळुंके, शिरागड हेमंत पाटील, नायगाव प्रकाश कोळी, दहिगाव अविनाश पाटील, इस्माईल तडवी, सावखेडा बबलू कोळी, किनगाव भरत पाटील, कोरपावली आशिष झुरका डे महेलखेडी गोकुळ कोळी, विनायक कोळी, मनवेल, जितू खंबायत मोहराळा, विरावली येथील नथूभाऊ, उपशहर प्रमुख यावल किरण बारी, मोहसीन खान, विजय पंडित ,पिंटू कुंभार, गणेश कोळी ,भालशिव गजानन कोळी, अनिल कोळी पिंपरी, मोहराळा, अजय कोळी, प्रवीण महाजन, संतोष महाजन आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.