चोपडा, प्रतिनिधी | सर्व शासकिय व निम शासकिय कार्यालयामध्ये ८ डिसेम्बर रोजी येणारी तेली समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात यावी, यासाठी तेली समाजातर्फे आज (दि.२०) येथील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जगनाडे महाराजांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून महाराजांची जयंती साजरी करण्याचे कळवले आहे. त्या परीपत्रकान्वये सर्व शासकिय कार्यालयांमध्ये जगनाडे महाराज यांची प्रतिमा असणे आवश्यक आहे, म्हणुन समस्त तेली समाजातर्फे अध्यक्ष के.डी.चौधरी, तेली समाजाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्या हस्ते तहसिलदार अनिल गावीत, सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी एस .बी.कोळी,उ पजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज पाटील यांना जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
सर्व शासकिय अधिकाऱ्यानी ८ डिसेंम्बर रोजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात शासकिय स्तरावर साजरी करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले. या प्रसंगी समस्त तेली समाजाचे माजी उपाध्यक्ष पितांबर भनकु चौधरी, माजी सेक्रेटरी जे.के.थोरात, कोषाध्यक्ष राजेंद्र गणपत चौधरी, सरचिटणीस भिका खंडु चौधरी, चिटणीस प्रशांत सुभाष चौधरी, चोपडा नगर पालीकेचे नगरसेवक सुनील पाडुरंग चौधरी, किशोर रघुनाथ चौधरी, चेतन एकनाथ चौधरी, युवा सेना अध्यक्ष दिपक श्रीराम चौधरी, विश्वस्त नारायण पंडित चौधरी, लक्ष्मण बंडु चौधरी, गोरख मधुकर चौधरी, विलास विजय पाटील, देवकांत चौधरी, महेंद्र चौधरी, तेली समाजाचे कार्यकर्ते अर्जुन चौधरी, गोपीचंद चौधरी, गोकुळ अमृत चौधरी, नारायण रघुनाथ चौधरी, फुलचंद चौधरी, गोपाल भणकु चौधरी, गोपाल प्रकाश चौधरी, विनोद शांताराम चौधरी, बापु शामराव चौधरी, पंकज चौधरी, अनिल चौधरी, गणेश गणपत चौधरी, ललेश चौधरी, डॉ.प्रदिप चौधरी, श्रावण शांताराम चौधरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.