जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

जळगाव – रेल्वे स्थानकावर असलेल्या २२ कुली बांधवांचे आणि परिवाराचे लॉकडाऊनमुळे मोठे हाल होत आहे. रेल्वेचे प्रवासी घटल्याने रोज खाण्याचे देखील वांधे झाले आहे. कुली बांधवांची अडचण लक्षात घेऊन जळगावातील व्यावसायिक ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत यांच्या सौजन्याने युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज दि.१३ रोजी दुपारी ५ वाजता, रेल्वे स्थानकाजवळ कुली बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले. 

 

यावेळी स्टेशन मास्तर ए.एम.अग्रवाल, रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक सी.एस.पटेल, क्षेत्रीय रेल्वे उपभोगता समिती सदस्य विराज कावडिया, युवाशक्ती फाऊंडेशनचे अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, वैभव पाटील, कुली बांधवांचे मुकादम अमीर खान व इतर कुली बांधव, नागरिक उपस्थित होते.

Protected Content