चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चाळीसगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन ठप्प आहे. अशात त्यांच्या संसारात हातभार लागावा म्हणून मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शासनात विलिनीकरण करावे यांसह विविध मागण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आले आहे. त्यात कर्मचाऱ्यांना मानधन बंद असल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हि चिंताजनक बाब लक्षात येताच मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळ कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले. व बुधवार रोजी चाळीसगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळांकडून एकनाथ गोपा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस.टी. कर्मचाऱ्यांनी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांचे आभार मानले. बीबीकेडी तालुका अध्यक्ष संजय राठोड, रमेश चव्हाण, गोरख एकनाथ राठोड, रामेश्वर राठोड, बळीराम जाधव खर्डे, बळीराम पवार लोंजे, प्रेमराज चव्हाण, मेघराज जाधव व भरत राठोड आदी उपस्थित होते.