अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील श्रीराज प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटपाचा शुभारंभ मदत व आपत्ती पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर तसेच स्व.दे ना पाटील हायस्कूल चौबारी या शाळेच्या विद्यार्थ्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मंत्री ना.अनिल पाटील यांच्या हस्ते प्रति विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना दोन-दोन गणवेश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक आधार पाटील हे उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांनी प्रास्ताविकात बोलताना ‘संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबरोबर सर्व शैक्षणिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे या उद्देशाने संस्था सदरचा उपक्रम दरवर्षी राबवते’असे सांगितले. यावेळी ना. अनिल पाटील यांनी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी दिल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष व कृ.उ.बा.समिती सभापती अशोक पाटील यांच्या माध्यमातून संस्थेच्या हजारावर विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश पुरविले जातात. यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे, स्व. दे.ना पाटील हायस्कूल चौबारी चे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास व उपस्थित शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी ना. पाटील यांचा सामूहिक सत्कार केला. याप्रसंगी ना. अनिल पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या केक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कापला व विद्यार्थ्यांना भरवला. याप्रसंगी सरस्वती विद्या मंदिरचे आनंदा पाटील, संगीता पाटील, गितांजली पाटील,धर्मा धनगर ,पूनम पाटील,शितल पाटील, प्राथमिक विद्या मंदिर बहादरपुर रोड अमळनेर शाळेचे अनिता शिसोदे, सुमेध मोहिते, सुनिल धनगर,दिनेश शिरसाठ,गोविंदा माळी ,दिनेश साळुंखे, समाधान शिंदे तसेच चौबारी हायस्कूलचे पी.एन.पाटील, पी.पी.पाटील, लिलाधर पाटील,चेतन पाटील,मेघन पाटील,संस्थेचे सागर भावसार,मोरे मॅडम,सारिका पाटील,विद्या पाटील आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.