जळगाव प्रतिनिधी । अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै ते सप्टेंबर २०२० चे धान्य एकत्रिटपणे मिळणार होते. परंतू नवीन निर्देशानुसार प्रत्येक महिन्याला धान्य वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जुलै ते सप्टेंबर 2020 या मासिक नियतनाबरोबरच 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे प्रति लाभार्थी अतिरिक्त मोफत अन्नधान्याचे वितरण तहसिलदार यांनी मंजूर केल्यानुसार स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.