चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथे माजी विद्यार्थी एकत्रित येऊन “शोध स्वतःचा विकास’ समाजाचा या संकल्पनेतून अंध, अपंग विधवा व गरजूंना बुधवार रोजी धान्य वितरीत करून माणूसकीचा संदेश दिला आहे.
तालुक्यातील चैतन्य तांडा येथील सन: २००८ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून “शोध स्वतःचा विकास’ समाजाचा या अभियानाला त्यांच्याकडून प्रारंभ करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत बुधवार रोजी चैतन्य तांडा येथे अंध, अपंग विधवा व गरजूंना धान्य वितरीत करून नवीन अध्याय निर्माण केले आहे. याबाबत माजी विद्यार्थी यांच्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना हि संकल्पना सर्वांनी आत्मसात करून प्रत्यक्षात राबविण्यात यावी असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणी किंवा परिसरात असंख्य असे आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवार असतात की, त्यांना दोन वेळेचे जेवण व्यवस्थित मिळत नाही. अशावेळी आपणच देवदूत होऊन अशा गरजूंना प्रामाणिकपणे मदत कराच असेही त्यांनी सांगितले. यावेळी अभिजित पवार, केतन राठोड, कल्पेश राणा, विजय सोनवणे, माजी चेअरमन दिनकर राठोड, महादू राठोड (मा. सरपंच) व जुलाल राठोड आदी उपस्थित होते.