अमळनेरात ‘निमा’ शाखेतर्फे गरजूंना फराळ वाटप

अमळनेर प्रतिनिधी । धन्वंतरी जयंतीचे औचित्य साधत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अमळनेर शाखेतर्फे शहरातील शंभर कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

फराळ वाटपानंतर पिंपळे रोडवरील अथर्व आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनीक येथे धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी निमा अमळनेर शाखेच्या अध्यक्षा डॉ.अंजली चव्हाण ,सचिव डॉ. लीना चौधरी, कोषाध्यक्षा डॉ.पुजा वाघुले ,सहसचिव डॉ.कृष्णा पाटील, डॉ.रूपाली पाटील, डॉ.माधुरी सूर्यवंशी, डॉ.भाविका पाटील, डॉ.रविंद्र जैन,  डॉ. संजीव चव्हाण, डॉ.अतुल चौधरी, डॉ.दिनेश गोकुळ पाटील, डॉ.हेमंत कदम, डॉ. विशाल बडगुजर, डॉ.सचिन पाटील, डॉ.कमलेश पाटील, डॉ.गौरव मुठे, डॉ.अक्षय न्याहळदे, डॉ.धनवंत पाटील उपस्थित होते.

 

Protected Content