यावल, प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात व राज्यात सुरू असलेल्या लाॅकडाउनचा फटका सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदीवासी पाडे, तांडे व गावातील कुटूंबाना बसला आहे. यात दोन महिला अधिकाऱ्यांकडून आदिवासी पाड्यावरील व गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
अशातच यावल तालुक्यातील रहिवासी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेत विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अँड. तनुजा तडवी, तसेच डॉ. नसिमा तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम येथे कार्यरत असलेल्या या दोघा महिला अधिकाऱ्यांनी माणुसकीचा धर्म पाळत एक सामाजिक बांधिलकी म्हणून लहसुनबर्डी या आदिवासी पाडया वरिल गरीब व गरजू आदीवासी बांधवांना जीवनावश्यक अशा किराणा किट कुटुंबांना वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना फराळाचे वाटप ही करण्यात आले. यामुळे ह्या लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलले होते. यावेळी लॉक डाऊनमुळे लावण्यात आलेल्या शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
तसेच या दोघ ही महीला अधिकारी यांनी पाडयावरील ठीकाणावर जिवन जगणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नसिमा तडवी यांनी कोरोनापासून कसे संरक्षण करावे, यासंदर्भात उपस्थित सर्व आदीवासी बांधव व महीला यांना अगदी सोप्यासरळ भाषेत मार्गदर्शनपर माहिती दिली व कोरोना या विषाणु संसर्गाला थोपण्यासाठी आपण सर्वांसाठी लसीकरणाचे किती महत्व आहे हे पटवून दिले.
या मदत कार्यात कुटुंबातील लहान मुले ईरम तडवी, हिररहिमा तडवी, मंजुर तडवी, तसेच वाहन चालक दसतगीर तडवी व संजय तडवी यांनी सुद्धा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सहकार्य करून मदत कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. अशा प्रकारे आदीवासी बांधवांना संकटासमयी मदतीचा हात दिला त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.