धरणगाव, प्रतिनिधी | येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आज रविवार १५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील मनोकल्प फाउंडेशनच्या वतीने बेडसीट, चादरी व टावेल यांचे वाटप करण्यात आले.
माऊली वारकरी शिक्षण संस्थेत एकूण ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण, शालेय शिक्षण, संगीत व किर्तन कथा प्रवचन यांचे शिक्षण दिले जाते. या संस्थेला कुठल्याही शासकीय अनुदान नाही. ही संस्था २५ वर्षापासून सेवा कार्यरत सुरू करत आहे. या संस्थेमध्ये अनाथ गरीब घराण्याचे विद्यार्थी अध्ययन करीत आहे. या संस्थेत शिक्षकाला पगार नाही व विद्यार्थ्याला फि नाही अशी विनामूल्य ही संस्था कार्य करीत आहे. या संस्थेमध्ये विद्यार्थ्यावर व श्री श्री १००८ महामंडलेश्वर हभप गु भगवानदासजी बाबा यांच्यावर नित्य प्रेम, श्रद्धा ठेवणारे संस्थेचे मनोकल्प फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष मनोज लीलाधर वाणी यांनी आज या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ६० बेडशीट चादरी व टावेल या विद्यार्थ्यांसाठी वाटप केले. ते या विद्यार्थ्यांना दर महिन्याला सहकार्य करत राहतात. हभप नाना महाराज वाघ धरणगावकर व हभप सुखदेव महाराज शास्त्री (वृंदावन) बोरखेडेकर यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळत आहे.