मुडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुडीयेथील कमलेश अशोक सूर्यवंशी यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ जि.प. प्राथमिक शळा आणि बोदरडे येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या १६६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेस सहा वह्या (अर्धा डझन ) वाटप करण्यात आल्या. यावेळी पंकज अशोक पाटील यांच्या हस्तेवाटप वह्या वाटप करण्यात आल्या.

तसेच मुडी येथील माध्यमिक विद्यालयातील प्रमोद मधुकर पाटील यांनीही आपल्या आईच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूडी प्र.डा. बोदर्डे येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून मुव्हेबल प्रोजेक्टर विथ स्पीकर देण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात अतिशय छान पद्धतीने प्रोजेक्टर नेऊन ऑनलाइन शिक्षण येता येऊ शकेल.

यावेळी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक सुरेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तुषार सैंदाणे, महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास सूर्यवंशी, निलेश शिंदे, प्रदीप पाटील
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प. शाळा मुडी, बोदरडे शाळेतील शिक्षक सतिष शिंपी यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर. के. पाटील, गोकुळ साळुंखे, शिंपी सर, कविता पाटील, स्वाती कदम, रागिणी लांडगे, प्रदिप पाटील, भैया पवार, वाल्मिक पाटील, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content