प.वि. पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्तीचे वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यावर्षी प्राथमिक गटात पूर्वेश पवार, केशरी कमोदे, श्री पाटील, सोहम भारंबे, जयदीप पाटील, सार्थक शिंपी, आयुष निकुंभ, कीर्ती धनगर, तन्मय मराठे, अनुष्का मिस्तरी, प्रियल कोळी, हितेन माळी, चिराग पवार, नव्या बोंडे, कार्तिक बाविस्कर, अनुष्का बावस्कर, हर्षदा अस्वार, नितेश चौधरी, देवर्षी चोपडे आणि स्वरा पाटील यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

माध्यमिक गटात प्रदीप जाधव, जानवी ठाकूर, देविका कांमळसकर, रितेश पाटील, तन्मय सरोदे, विश्वप कमळसकर, रितेश जाधव, रोशनी दुसाने, लावण्या चौधरी, निवृत्ती राठोड, रोहित पाटील आणि गिरीश सोनवणे यांना शिष्यवृत्तीचे लाभार्थी घोषित करण्यात आले.

शिष्यवृत्तीचे वाटप केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका धनश्री फालक, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत मिळत असून, त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

Protected Content