भुसावळ (प्रतिनिधी) येथील आशिया महामार्ग क्रमांक ४६ वरील पंजाब खालसा हॉटेल व भुसावळ गुरुद्वारा सिंह सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शीख धर्मियांचे ५ वे धर्मगुरू अर्जुनदेवजी यांच्या शहीद दिनानिमित्त आज दि.२१ मे रोजी शीतपेय व फराळ वाटप करण्यात आले.
शीतपेय व फराळ वाटप करतांना पंजाब खालसा हॉटेलचे संचालक सारंगधर (छोटू)पाटील, रवींद्रसिंह चाहेल,जस्सीसिंह ठेठी, सनीसिंह ठेठी,बलदेव सिंग पल्हा,इंद्रजीत सिंह,मनीष सरंगधर पाटील,पंकज शर्मा, जयेश सरंगधर पाटील, शिवम जयसिंघानिया, प्रदीप पाटील, संदीप पाटील, गुरुमित चाहेल, चेतन सिंह, कुलदीपसिंह बल, गुरदयाल सिंह, निम्मा मिस्तरी, सरबजित सिंह,भोला सिंह,गुरप्रीत सिंह,भावेश व्यास,गुरमितसिंह बल, यूपीसिंह, परमजितसिंह बल, राजन सिंह, मनदिप बल,अकतर शहा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ५ हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला.