यावल येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज रावेरचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धनादेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. 

दरम्यान आज (दि.२१ सप्टेंबर) रोजी यावल तहसील कार्यालयात रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष मधुकराव चौधरी यांच्या हस्ते दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमाविता व्यक्ति मरण पावल्याने शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेद्वारे आर्थिक संकटात आलेल्या गरीब कुटुंबाच्या पालन कार्यकत्यास २० हजार रुपयांची मदत दिली जाते, अशा यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील प्रमिला तुळशीराम कोळी आणि सुंनदा प्रकाश कोळी, यावलच्या प्रियंका प्रकाश फेगडे व आशा मुशीर पटेल, कासवे तालुका यावलच्या सुंनदा संजय सोनवणे, भालोद येथील छाया सुनिल कोळी, न्हावी प्रगणे, दिक्षा किशोर इंगळे यांचा समावेश असुन या सात लाभार्थी महिलांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे एक लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

 या प्रसंगी तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील , माय सांगवीचे माजी सरपंच डी. के. पाटील, अनिल जंजाळे, युवक काँग्रेसचे इम्रान पहेलवान संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार बबीता भुसावरे , इंगायोचे अव्वल कारकुन रवीन्द्र मिस्तरी हे प्रामुख्याने उपास्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Protected Content