यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासनाने पाठवलेल्या ‘शालेय पोषण आहार योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांना बिस्कीटचे पुडे वाटप करण्यात आले.
यामध्ये इत्तया १ली ते इत्तया ४थी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ७ बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. हिंगोणा मराठी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास श्रीधर भालेराव यांच्याहस्ते सर्व विद्यार्थांना बिस्कीटचे पुडे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय समितीचे सदस्य राजू तडवी, पालक कय्युम शेख. फरीद शेख. शाळेचे मुख्याध्यापक हेमंत बोरोले, सुनिता बोरोले, केतन महाजन आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.