पाचोरा महाविद्यालयात गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास निधीतून महाविद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थिनींना माजी आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्याहस्ते गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला. यात कु. चारूलता भागवत चौधरी, कु. वेदिका प्रकाश जाधव, कु. हर्षदा रमेश परदेशी, कु. जयश्री अनिल पाटील, कु. वैष्णवी प्रल्हाद कोष्टी, कु. कृतिका सुकलाल पाटील, कु. कल्याणी दीपक वल्वे, कु. विद्या प्रविण पाटील, कु. विदिशा भीमराव मगर, कु. वैष्णवी वाल्मिक पाटील, कु. शिवानी जिभाऊ मोरे, कु. किरण वामन पाटील, कु. तेजस्विनी ज्ञानेश्वर पाटील, कु. साक्षी नितीन पाटील, कु. रोहिणी शालिक पाटील, कु. तेजस्विनी शिवाजी निकवाडे, कु. श्रुती राजेंद्र चौधरी, कु. यशस्वी राजेंद्र देसले, कु. चांदणी सुदामा कोरी व कु. पौर्णिमा नाना शिंपी यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमांतर्गत ‘पुस्तक परीक्षण व कथन’ या स्पर्धेत कु. नेहा किरण बेलदार, कु. तेजस्विनी प्रदीप नवे व कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर या विजेत्या विद्यार्थिनींना तर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. गिरीश पाटील यांना ‘जिल्हा क्रीडादूत’ या सन्मानाबद्दल संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन अधिकारी, पत्रकार, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Protected Content