जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने आरबीएल बँकेमार्फत जामनेर तालुक्यातील सहा शाळांमधील 300 विद्यार्थिनींना मोफत सायकल व स्कूल किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरावा, या उद्देशाने ‘उम्मीद’ उपक्रमांतर्गत राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि मान्यवर उपस्थिती हा कार्यक्रम जिल्हा परिषद मराठी शाळा वाकी रोड येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त उपअभियंता जे. के. चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल जामनेरचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, नगरसेवक आतीश झाल्टे, सचिव दिपक तायडे, उपशिक्षणाधिकारी विजय सरोडे, गटशिक्षणाधिकारी राम लोहार, आरबीएल बँकेचे प्रमुख बाळकृष्णन आणि आरबीएल बँकेचे सीएसआर प्रमुख रोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींसाठी शिक्षणास मदतीचा उपक्रमआरबीएल बँकेच्या ‘उम्मीद’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रवास करताना अडथळा येऊ नये आणि त्यांचा शिक्षणाचा प्रवास अबाधित राहावा, या उद्देशाने 300 विद्यार्थिनींना सायकली वितरित करण्यात आल्या. या विद्यार्थिनींमध्ये जिल्हा परिषद शाळा तळेगाव, जिल्हा परिषद शाळा शेळगाव, जिल्हा परिषद शाळा मेनगाव, जिल्हा परिषद शाळा गोद्री, आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा तोंडापूर येथील विद्यार्थिनींचा समावेश होता. भविष्यात अधिक मदतीचा आशावादया उपक्रमाचे भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी कौतुक केले. भविष्यातही सीएसआर निधीतून इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे सायकलींचे वाटप करावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदानकार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख संदीप पाटील यांनी केले, तर आभार आरबीएल बँकेचे रोहित अग्रवाल यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख विकास वराडे, संजय पाटील, सुरेश आंभोरे, संदीप पाटील, लाभार्थी विद्यार्थिनींचे पालक, शिक्षण विभागाचे कर्मचारी, साधन व्यक्ती, विषयतज्ञ, तळेगाव शाळा टीम तसेच आरबीएल बँकेचे अधिकारी कर्मचारी रेखा बोरोले आणि त्यांची टीम यांनी विशेष मेहनत घेतली.