उडान प्रोजेक्ट अंतर्गत स्तुत्य उपक्रमाने भारावले गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनी
जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रांतपाल आशाजी वेणुगोपाल संकल्पित उडान या उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप करण्यात आले. सायकलीची निम्मी किंमत डिस्ट्रिक्ट ३०३० ने दिलेली असून उर्वरित निम्मी किंमत रोटरी क्लबचे स्थानीक क्लब देत आहेत. त्या अंतर्गत रोटरी क्लब जळगाव यांचे कडून मोफत ५० सायकलींचे वाटप विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थीनींना करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष मनोज जोशी, मा. सचिव ॲड. हेमंत भंगाळे, असि. गव्हर्नर नितीन इंगळे, नॉन मेडिकल चेअमन जितेंद्र ढाके, प्रेम कोगटा, राघवेंद्र काबरा, नंदकिशोर जाखेटीया, योगेश गांधी, संदीप शर्मा, ॲड. सागर चित्रे, स्वाती ढाके, संध्या महाजन, डॉ. शुभदा कुलकर्णी, पराग अग्रवाल, नितीन काळूखे, रितेश जैन, असिफ मेमन आदी उपस्थित होते. या उपक्रमाला प्रेम कोगटा यांचे कडून ५, किशोर मंडोरा यांचे कडून ५, नंदकिशोर जाखेटे यांचे कडून ५, कवरलाल संघवी यांचे कडून १०, स्वाती ढाके-१०, किरण बेंडाळे यांचे कडून ५, संदीप शर्मा यांचे कडून ५, संध्या महाजन यांचे कडून २, राजेश वेद यांचे कडून २, डॉ. जयंत जहागीरदार यांचे कडून १ सायकलची मदत प्राप्त झाली.