दगडी, मनवेल येथे अतिक्रमण नियमित करत दाखले वाटप

yaval gharakul

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या 17 वर्षापासून मंजूर झालेल्या घरकुल धारकांना हक्काची जागा मिळाली नाही. घरकुलपासून वंचित असलेल्या दगडी येथे २१ तर मनवेल येथे २२ असे ४३ बेघर वासियांचे अतिक्रम नियमित करुन नमुना नं.८ चे वाटप करण्यात आले.
याचबरोबर घंटागाडी आणि एलईडी.टीव्हीचे लोकांर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दगडी येथे २१ तर मनवेल येथे २२ असे ४३ बेघर वासियांचे अतिक्रम नियमित करुन नमुना नं8 चे वाटप प्रांताधिकारी डॉ. अभिजीत थोरबोले, जिल्हा नियोजन मंडळातील कायम निमंत्रिक सदस्य हिरालाल चौधरी आणि तहसीलदार जितेंद्र कुवर यांचासह विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नियोजन मंडळाचे सदस्य हिरालाल चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अभीजीत थोरबोले, तहसिलदार जितेद्र कुंवर, जि.प.सदस्य सविता भालेराव, प.स.सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, बोराळे उपसंरपच उज्जनसिंग राजपुत, प.स.सदस्य तथा भा.ज.पा.गटनेते दिपक पाटील, महेद्र कोळी, मा.प.स.सदस्य अरुण पाटील हे उपस्थित होते.

प्रांत अधिकारी अभीजीत थोरबोले, प,स.सदस्य दिपक, पाटील सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षस्थांनी भाषणात नियोजन मंडळातील नवनिर्वाचीत सदस्य हिरालाल चौधरी यांनी पहिल्याच सभेत दगडी येथील २१ व मनवेल येथील २२ अशा ४३ लाभार्थांना २००२ पासुन घरकुल मंजूर होते. मात्र हक्काची जागा नसल्यामुळे बेघर वासीयांचे होणारे हाल हा प्रश्न नियोजन मंडळाची बैठकीत प.स.सदस्य दिपक पाटील, संरपच नरेद्र पाटिल यांनी तात्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जागा मंजूर करुन पुढील रखडलेले प्रश्‍न कागदपत्रे सविस्तर मांडून प्रश्‍न मार्गी लावले.

याबद्दल आवाज उठाल्यामुळे गरीबांच्या हाती नमुना न.८ वाटप या कार्याक्रमाचे कौतुक करुन प.स.सदस्य दिपक पाटील यांनी शासनाच्या योजनांर्तगत मनवेल येथील ४ व साकळी येथील १ शेत रस्त्यांचे काम मंजुर केल्याची माहीती दिली. यावेळी ग्रामपंचायत उपसंरपच सिंधु मोरे, ग्रा.पं.सदस्य वासुदेव पाटील, नरहर भिल, प्रताप पाटील यांच्यासह गावातील आजी माजी सरपंच, ग्रा.पं. सदस्य व विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक सरपंच नरेद्र पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन वाय.पी.पाटील यांनी मानले.

Protected Content