पाचोरा प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळेत ‘गणित दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी जगभरामध्ये भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जनमदिन “मॅथमॅटिक्स डे” गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी मध्ये गणित विषयी विषयाची रुची निर्माण करण्यासाठी व गणित विषय मजबूत करण्यासाठी शाळे मार्फत विविध कृती घेण्यात आल्या. या ऍक्टिव्हिटीज मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
या विद्यार्थ्यांमध्ये गणित विष्याची रुची निर्माण करण्यासाठी शाळा मार्फत टेबल ऍक्टिव्हिटी (पहाड़ सरगर्मी) घेण्यात आली. अक्सा फरीद खान (इयत्ता पाचवी) नमिरा राजिक बागवान (इयत्ता सहावी) सादिया सलीम शेख (इयत्ता सातवी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ज़ोया अनिस खाटीक (इयत्ता पाचवी) अक्सा नईम बागवान (इयत्ता सहावी) अरशीन शामिर खान (इयत्ता सातवी) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून पाचोरा तालुका केंद्रप्रमुख सलाउद्दीन मोहम्मद गौस उपस्थित होते. यांनी अशाच प्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास मध्ये सहभाग घ्यावे असे आवाहन केले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना व उद्दीष्ठे जावेद रहीम यांनी सादर केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल एजाज़ अब्दुल रऊफ, पदवीधर शिक्षक शेख कदीर शेख शब्बीर, भोकरी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शेख अश्फाक शेख अहमद, इसराइल खान, शिक्षिका माज़ेदा अंजुम, शाहिदा पटवे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख कदीर शेख शब्बीर यांनी केले.